गांडुळखत (व्हर्मिकल्चर) प्रोजेक्ट : मुंबईमधून १९६८ किलो सेंद्रीय खत जमा करण्यात आले (गोळा केले गेले.)

प्रकल्प :

Aniruddha Foundation - Vermiculture-Oct 15, 2017श्री अनिरूध्द्द उपासना फांऊडेशन’ आणि त्यांची संलग्न संस्था ’अनिरूध्दाज ॲकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे हे जाणून गांडुळखत/ गांडुळशेती (व्हर्मिकल्चर) ह्या एक महत्त्वाच्या प्रकल्पाचा (प्रोजेक्टचा) त्यांच्या प्रकल्पांमध्ये (प्रोजेक्ट्समध्ये) समावेश केला गेला.

वाढत्या शहरीकरणामुळे शहरांमधील घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिग ग्राऊंडची (घनकचरा साठवन्याची वा उतरवण्याची) व्यवस्था करणे हे मोठे आव्हान भेडसावत आहे. अनिरूध्दाज ॲकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटने घरगुती पातळीवर स्वयंपाकघरातील (किचनमधील) बायोडिग्रेडेबल कचर्‍याला गांडुळखतात रूपांतरीत करण्यासाठी एक अत्यंत सोपी आणि स्वस्त , किफायतशीर पध्दत शोधून काढलीआहे.

गांडुळशेती हे गांडुळांचे संगोपन करण्याचे एक विज्ञान/शास्त्र आहे, ज्यांचा नैसर्गिक बायोरिॲक्टरस म्हणून कचरा व्यवस्थापनात वापर केला जातो. गांडुळ हे जमिन भुसभुशीत करायला आणि खत पुरवून मातीची सुपीकता वाढवायला मदत करीत असल्याने त्यांना शेतकर्‍यांचा उत्तम मित्र (बेस्ट फ्रेंड)असे म्हटले जाते. तसेच गांडुळ हे कंपोस्टिंगची पध्दत वापरून गांडुळखत तयार करायला मदत करतात. गांडुळ हे बायोडिग्रेडेबल कचर्‍यावर चांगले पोसले जातात आणि त्याची विल्हेवाट लावून ,भरपूर पोषक तत्त्वांनी समृध्द , संपन्न असे गांडुळखत हे सेंद्रीय खत तयार करतात. तसेच गांडुळापासून मिळणारा द्रव म्हणजे व्हर्मिवॉश हा सुध्दा वापरासाठी अत्यंत उपयोगी आहे. व्हर्मिवॉश हा पर्णासंबंधी वापरण्याचा एक फवारा (स्प्रे) आहे, जो द्रव, प्रवाही खत म्हणून प्रत्यक्ष (डायरेक्ट) पानांवर फवारता येतो.

Aniruddha Foundation - Vermiculture-Oct 15, 2017

श्री अनिरूध्द्द उपासना फांऊडेशन आणि अनिरूध्दाज ॲकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ह्यांनी संयुक्तरीत्या मध्ये रेल्वे, सेबी, नेव्हल डॉकयार्ड (कुलाबा), पंचखानावाला बॅंकर्स ट्रेनिंग इंस्टिट्युट, डिआयएल लिमीटेड, भवन्स कॉलेज, आय ई एस शाळा (मरोळ), सर्व वॉर्डांमधील म्युन्सिपल शाळा, तुंगा इंटरनॅशनल हॉटेल इत्यादी ठिकाणीं गांडुळशेतीवर प्रशिक्षण दिले आहे. आतापर्यंत ५०० टनाहून अधिक गांडुळखत गरजू शेतकर्‍यांना विनामूल्य वाटण्यात आले आहे. श्री अनिरूध्द्द उपासना फांऊडेशनतर्फे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांमध्येही ह्या गांडुळखताचा वापर करण्यात आला आहे.

श्री अनिरूध्द्द उपासना फांऊडेशनतर्फे राबविण्यात आलेल्या प्रकल्पांपैकी (उपक्रमांपैकी ) गांडुळशेती आणि वृक्षारोपण हे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत कारण ते मानवाचे निसर्गाशी आपौलकीचे नाते बांधतात आणि आपल्यावरील धरणी मातेचे ऋण फेडण्यास मदत करतात/ (सहाय्य करतात).

ताज्या घडामोडी :

सध्या विरार, नालासोपारा , कोचिवडे येथे अनेक ठिकाणी गांडुळखत प्रकल्प सुरु आहेत / कार्यरत आहेत. ऑक्टोबर २०१७ मध्ये ४ उपासना केंद्रामध्ये एकत्रित करण्यात आलेले एकूण गांडुळखताचे वर्गीकरण खाली दिल्यप्रमाणे आहे –

नालासोपारा – ६८ किलो

विरार (पूर्व) पाटीलवाडी – ५५० किलो

विरार (पश्चिम) भाटपाडा – १२०० किलो

कोचिवडे – १५० किलो

Aniruddha Foundation - Vermiculture-Oct 15, 2017 (1)

फोटो कॅपशन : गांडुळखत प्रकल्प – मुंबई – एक्स्टेंडेड वेस्टर्न झोन मधील ४ जागांहून १९६८ किलो सेंद्रिय खत एकत्र करण्यात आले.

Aniruddha Foundation - Vermiculture-Oct 15, 2017

Leave a Reply

WP2FB Auto Publish Powered By : XYZScripts.com